पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील सात दिवसांचा कार्यक्रम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या सात दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. यात दौऱ्यात ते महत्वपुर्ण हाऊडी मोदी कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. भारतासह अनेक देशांचे या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, त्यांच्या या सात दिवसांच्या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सुरूवातील अमेरिकेच्या दौऱ्यावर बहुप्रतिक्षित हाऊडी मोदी कार्यक्रमास संबोधित करणार आहेत. यानंतर ते युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (यूएनजीए) मध्ये संबोधित करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी देशाच्या अंतर्गत मुद्द्यांसह तसेच इतरही अनेक विषयांवर चर्चा करतील. पंतप्रधानांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात पुढील मुद्दे प्रमुख ठरतील…

22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान अमेरिकेच्या ह्युस्टन शहरात भारतीय-अमेरिकन समुदायाला संबोधित करतील. यावेळी ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत असतील. या काळात पंतप्रधान जम्मू-काश्‍मीरमधून कलम 0 37 हटवण्याबाबत आणि काश्‍मीरमधील सद्य परिस्थितीबद्दल चर्चा करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे. पाकिस्तानचा भारताच्या या निर्णयाला तीव्र विरोध आहे आणि भारताने त्याचे वर्णन पूर्णपणे अंतर्गत बाब म्हणून केले आहे. त्यामुळे याविषयावर मोदी काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

21 ते 27 सप्टेंबर या अमेरिकेच्या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान मोदी सर्व खंडांच्या नेत्यांशी सुमारे 20 बैठक घेतील. या दरम्यान, आंतरराष्ट्रीय मुद्दयांवर बोलण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारताच्या भूमिकेबाबतही ते चर्चा करू शकतात. पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र महासभेच्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करतील. यावेळी पंतप्रधान विकास, हवामान बदल आणि अन्य द्विपक्षीय आणि बहुपक्षीय विषयांवर विचार करतील. मोदी दहशतवादावरही बोलणार आहे, परंतु त्यावर जोर देण्याऐवजी आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये भारताच्या भूमिकेवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच 24 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी एका विशेष कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.