ह्यूस्टनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाचा जयघोष

ह्यूस्टन : अमेरिकेतील ह्यूस्टन या ऐतिहासिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकास्थित भारतीयांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात स्वागत केले. त्याला मोदींनीही हात उंचावून अभिवादन केले. तसेच गुड मॉर्निंग ह्यूस्टन, गुड मॉर्निंग टेक्‍सास, गुड मॉर्निंग अमेरिका असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाउडी मोदी कार्यक्रमातील आपल्या भाषणाची सुरूवात केली. भाषणादरम्यान, मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भरभरून स्तुती करताना भारताचा खरा मित्र जगात कोणी असेल तर तो व्हाइट हाऊसमध्येच आहे असे म्हटले. तसेच, अबकी बार, ट्रम्प सरकार असाही मोदींनी यावेळी नारा दिला.

अब्जावधी लोक डोनाल्ड ट्रम्प यांचा शब्द न शब्द फॉलो करतात असेही मोदी म्हणाले. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचे मोठे वजन आहे. ट्रम्प यांनी नेहमीच आपलेपणा दाखला असल्याचेही मोदींनी सांगितले. तर ट्रम्प यांनी देखील आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांची भरभरून स्तुती करताना, पंतप्रधान मोदी खूप चांगले काम करत असल्याचे सांगितले. शिवाय लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल मोदींचे अभिनंदनही केले. मोदी म्हणाले की, आज दोन मोठ्या लोकशाही राष्ट्रांच्या मैत्रीचा दिवस आहे व आज इतिहास घडत असताना संपूर्ण जग साक्षीदार आहे. मला 2017 मध्ये ट्रम्प यांनी त्यांच्या कुटूंबाची भेट घडवली होती असे सांगत, मी आज त्यांना माझ्या कुटूंबाची भेट घडवत असल्याचे म्हणत मोदींनी उपस्थित भारतीय नागरिकांकडे हात दाखवल्यानंतर नागिराकांनी जोरदार प्रतिसाद दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)