इस्राईलच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी प्रचारासाठी वापराला मोदींचा फोटो

नवी दिल्ली : देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच जादू सर्वत्र पहायला मिळाली होती. परंतू, त्यांची ही जादु आता फक्‍त भारतापुरती मर्यादित राहिली नाही तर परदेशातही त्यांच्या जादूचे लोण पसरल्याचे दिसत आहे. त्याचे एक जिवंत उदाहरण समोर आले आहे. इस्राईलमध्ये निवडणुकांचे वारे आता जोर धरू लागले आहे. या निवडणुकांचे खास आकर्षण ठरत आहे ते म्हणजे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आंमलात आणलेली युक्‍ती. नेतान्याहु यांनी आपल्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर केला आहे. त्यामुळे तिथेही मोदींची जादू दिसणार असल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यासह नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे पंतप्रधान ब्लादीमार पुतीन यांच्या फोटोंचाही वापर केला आहे. या तिघांचा फोटो वापरून नेतन्याहू यांनी परराष्ट्र धोरणात आपल्याला मिळालेल्या यशाची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नेतन्याहू यांनी जगभरातील नेत्यांना भेटल्याचा एक व्हिडीओ प्रसारित केला आहे. त्यात वेगवेगळ्या कार्यक्रमातील माहिती आहे. दरम्यान, मागील एप्रिल महिन्यातच इथे निवडणुका पार पडली होती. त्यात नेतन्याहू यांच्या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते तसेच इतर कोणत्याही पक्षासोबत त्यांची युती झाली नाही. त्यामुळेच आता सप्टेंबरमध्ये इथे निवडणुका पार पडणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)