Dhananjay Munde In Parali | बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तसेच खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. मात्र यानंतर कराड समर्थकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे परळीमधील वातावरण चांगलेच तापले आहे.
वाल्मिक कराड राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहे. यामुळे त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात 10 मिनिटे बैठक झाली. त्यानंतर ते रात्री परळीला रवाना झाले आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या क्लासला मुंडे गैरहजर
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहे. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. पालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही चर्चा महत्त्वाची असल्याचे म्हंटले जात आहे. मात्र धनंजय मुंडे परळीला गेल्याने पंतप्रधान मोदी यांच्या क्लासला हजर राहू शकणार नाहीत. यानंतर आता अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. Dhananjay Munde In Parali |
दरम्यान, बीडमधील वातावरण सध्या चिघळले असताना धनंजय मुंडे आणि मोदींची भेट झाल्यास त्याची विनाकारण चर्चा होऊ शकते. त्यामुळे धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यासाठी परळीला पाठवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. Dhananjay Munde In Parali |
तर व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्याने मुंडे पक्षाची परवानगी घेऊनच परळीला गेले असल्याचे माहिती मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
वाल्मिक कराडवर मकोका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. मस्साजोगचे ग्रामस्थ हे चांगलेच संतापल्याचे बघायला मिळाले. वाल्मिक कराडवर मकोका लावण्याच्या मागणीसाठी प्रमुख हे आंदोलन करण्यात आले. आता वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. आज परत वाल्मिक कराडला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
वाल्मिक कराडच्या आईसह समर्थकांचे आंदोलन
दरम्यान वाल्मिक कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी वाल्मिक कराडच्या आईसह समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आले असले तरी आज सकाळी पुन्हा समर्थकांनी आंदोलन सुरु केले आहे. Dhananjay Munde In Parali |
हेही वाचा:
‘…तर मोहन भागवतांना अटक झाली असती’ ; आरएसएस प्रमुखांच्या ‘स्वातंत्र्य’ विधानावर राहुल गांधी संतापले