पंतप्रधान मोदी ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक 

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ निश्चित झाला आहे. यंदाही वाराणसी लोकसभा मतदारसंघातून मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत झालेल्या संसदीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

२०१४मध्ये लोकसभा निवडणुकांच्या वेळी मोदींनी उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि गुजरातमधील बडोदा अशा दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर ते मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. बडोद्याची जागा मोदींनी पाच लाख ७० हजार १२८ मतांच्या फरकाने जिंकली होती, तर वाराणसीतून तीन लाख ७१ हजार ७८४ च्या मताधिक्याने मोदींनी ‘आप’च्या अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला होता. दरम्यान, अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.