पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर 

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 19 फेब्रुवारी 2019 ला उत्तर प्रदेशातल्या वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या ठिकाणी ते विविध विकासकामांचे अनावरण करणार आहेत. डिझेलवरून विजेवर परिवर्तीत झालेल्या पहिल्या रेल्वेगाडीला पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. हा उपक्रम “मेक इन इंडिया’अंतर्गत राबवण्यात आला आहे. यासाठीचे संशोधन आणि विकास भारतातच झाला.

तसेच सिरगोवर्धनपूर इथल्या श्री गुरू रविदास जन्मस्थान मंदिरात, गुरू रविदास जन्मस्थान विकासासाठीच्या प्रकल्पासाठी पायाभरणी करतील. या ठिकाणी ते जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. याशिवाय बनारस हिंदू विद्यापीठाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. तसेच लेहरतारा येथे होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचे उद्‌घाटन करतील. त्यानंतर वाराणसीतल्या आऊरे गावात अनेक विकासकामांचे उद्‌घाटन पार पडणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.