नवी दिल्ली : फ्रान्समद्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयीच्या परिषदेचे सहअध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार आहेत. यजमान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्याबरोबर ते या आंतरराष्ट्रीय परिषदेचे सहअध्यक्ष असणार आहेत. मोदी यांच्या या फ्रान्स दौऱ्यामध्ये ते येत्या १० ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या इंडो-फ्रान्स सीओईंच्या मंचालाही संबोधित करणार आहेत.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी आज पत्रकार परिषदेत मोदींच्या या कार्यक्रमांची माहीती दिली. फ्रान्समध्ये होणाऱ्या कृत्रिम या परिषदेमध्ये बुद्धिमत्तेच्या विकासावर भर देण्यात येणार असून या क्षेत्राबद्दल भारताला असलेल्या अपेक्षांवरही भर दिला जाणार आहे. एआय ऍप्लिकेशन्सची रचना, विकसित, तैनात आणि सुरक्षित मानवीय जबाबदार विश्वासार्ह पद्धतीने वापरली जावयावरही विशेष भर दिला जाणार आहे.
या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान १० फेब्रुवारी रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दाखल होणार आहेत. त्याच दिवशी फ्रान्सचे अध्य मॅक्रॉ यांनी आयोजित केलेल्या बोजनसमारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. दिनांक ११ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ए-आय परिषदेमध्ये अर्थकारण, राजकारण, समाजकारण आणि प्रशासन या क्षेत्रांसह अन्य क्षेत्रातील ए-आयच्या वाढत्या वापराचा आढावा घेतला जाणार आहे, असे मिस्री यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी भारत-फ्रान्समधील उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मंचालाही संबोधित करणार आहेत. ते मार्सेली बंदरालाही भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ हे दोन्ही नेते आंतरराष्ट्रीय थर्मल आण्विक प्रायोगिक अणुभट्टीची जागा असलेल्या कॅडरशेला भेट देतील, हा एक उच्च विज्ञान प्रकल्प आहे. यामध्ये भारत इतर काही देशांसह भागीदार आहे, असे मिस्री म्हणाले.