नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. दोन दिवसांच्या गुजरात दौर्यावर आलेल्या मोदींनी आज नर्मदा जिल्ह्यात भव्य आरोग्य वनचे उद्घाटन केले आहे. हे वन लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी जवळ आहे. 17 एअर भागावर औषधी रोपांची यामध्ये लागवड करण्यात आली आहे.
Gujarat: Prime Minister Narendra Modi takes a tour of 'Arogya Kutir' at the 'Arogya Van' in Kevadia.
The park has hundreds of medicinal plants and herbs and also provides information about their usage and importance. pic.twitter.com/p1IQaUuo3u
— ANI (@ANI) October 30, 2020
केवाडियामध्ये येणार्या पर्यटाकांना आकर्षित करण्यासाठी तसेच औषधी वनस्पतींची ओळख त्याचे फायदे या वनात पहायला मिळणार आहेत. तसेच योगा, ध्यान, आयुर्वेद यांचा आरोग्याला कसा फायदा होतो याच महत्त्व पटवून देत जनजागृतीचं काम देखील आरोग्य वन मध्ये होणार आहे.
#WATCH| Gujarat: Prime Minister Narendra Modi takes a tour of 'Arogya Van' in Kevadia after inaugurating it. pic.twitter.com/9QXx0IL3Jh
— ANI (@ANI) October 30, 2020
आरोग्य वनमध्ये नेमकं काय काय बघायला मिळणार?
* योगसाधनेचे महत्त्व पटवण्यासाठी आरोग्य वनच्या प्रवेशद्वारावरच सूर्य नमस्कारातील 12 स्थितींचा समावेश असलेल्या मानवी आकृती आहेत.
* मानवी आयुष्यात वनऔषधींचा कसा उपयोग होऊ शकतो याची माहिती देणारी डिजिटल इंफॉर्मेशन येथे आहे.
* कोणत्या अवयवासाठी कोणती वनौषधी आवश्यक आहे कसा वापर केला जाऊ शकतो याची माहिती देणारी एक मानवाकृती देखील या आरोग्य वनात आहे. ती आकृती या वनातील महत्त्वाचं आकर्षण देखील आहे.
* आरोग्य वनात पाच अन्य विविध गार्डन देखील आहेत. त्याचं स्वतःचं एक महत्त्व आहे.