रशियाकडून पंतप्रधान मोदींना सर्वोच्च नागरी सन्मान

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा “ऑर्डर ऑफ सेंट ऍन्ड्रयुज द ऍपोस्टल’ हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. भारत आणि रशिया या दोन्ही देशांमध्ये निकटचे संबंध निर्माण केल्याबद्दल हा सन्मान मोदींना देण्यात येणार आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये संरक्षण भागीदारी ाणि मैत्रीचे संबंध प्रस्थापित केल्याबद्दल मोदींना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. विज्ञान, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात रशियाच्या समृद्धीसाठी, गौरवासाठी अतिउल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍तींना “ऑर्डर ऑफ सेंट ऍन्ड्रयुज द ऍपोस्टल’ या पुरस्काराने गौरवण्यात येते. रशियाच्या मित्र देशांच्या प्रमुखांनाही या पुरस्कारासाठी निवडले जाते.

यापूर्वी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, कझाकस्तानचे अध्यक्ष नूरसुलतान नाझारबायेव आणि अझरबैजानचे अध्यक्ष गायदर अलीव यांनाही “ऑर्डर ऑफ सेंट ऍन्ड्रयुज द ऍपोस्टल’ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

सर्व साधारणपणे “ऑर्डर ऑफ सेंट ऍन्ड्रयुज द ऍपोस्टल’ हा पुरस्कार ग्रॅन्ड क्रेमलिन पॅलेसमधील सेन्ट ऍन्ड्रयुज हॉलमध्ये वितरीत केला जातो. “ऑर्डर ऑफ सेंट ऍन्ड्रयुज द ऍपोस्टल’ हा पुरस्कार द्यायला 1698 साली येशुचे पहिले शिष्य आणि रशियाचे संत सेंट ऍन्ड्रयुज यांच्या स्मरणार्थ तत्कालिन झार पीटर द ग्रेटच्या कालावधीत सुरुवात झाली.
संयुक्‍त अरब अमिरातीनेही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींना “द ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने गौरवले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.