नवी दिल्ली – कोरोना विषाणू संकटाचा सामना करण्यासाठी सध्या जगाच्या पाठीवरील अनेक देश एकमेकांना मदत करताना दिसत आहेत. संपूर्ण जग कोरोनाचा सामना करण्यासाठी एकवटलं असतानाही पाकिस्तान मात्र आपल्या कुरापती सोडण्यास तयार नाही. एकीकडे भारत जगाला हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाचा पुरवठा करत कोरोनाविरोधातील लढ्याला बळ देतोय तर दुसरीकडे पाकिस्तान भारताविरोधात दहशवादी कारवाया घडवून आणतोय.
याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलिप्ततावादी देशांच्या प्रमुखांशी (नाम) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधताना पाकिस्तानच्या या ना-पाक कारवायांची पोलखोल केली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता, “सध्याच्या घडीला संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत असतानाही काही लोक दहशतवाद, बनावट व्हिडीओ, खोट्या बातम्या पसरवून देश व धार्मिक विभाजन करण्याचा प्रयत्न करत आहेत.” असा टोला लगावला.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी भारताने ‘नाम’च्या ५९ सदस्य देशांसह एकूण १२३ देशांना कोरोनावर मात करण्यासाठी वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा केला आहे. भारत सध्या कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी योग्य औषध उपचार पद्धती व प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी प्रयत्नशील असल्याचे देखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितले.
#WATCH “Even as the world fights #COVID19, some people are busy spreading some other deadly viruses such as terrorism, fake news and doctored videos to divide communities and countries,” PM Narendra Modi while addressing Non-Aligned Movement Summit through video conferencing pic.twitter.com/BE85S4qhd9
— ANI (@ANI) May 4, 2020