बिहारच्या विजयोत्सवात पंतप्रधान मोदींचे संबोधन; वाचा महत्वपूर्ण मुद्दे

नवी दिल्ली – 21 व्या शतकात देशाच्या राजकाराणाचा मुख्य आधार केवळ आणि केवळ विकासच असणार आहे, हे बिहारमधील निवडणूक निकालाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 

देशाचा विकास राज्याचा विकास आज सर्वात मोठी कसोटी आहे व येणाऱ्या काळातही हाच निवडणुकीचा आधार राहणार आहे. जे लोकं हे समजतच नाहीत, त्याचे जागोजागी डिपॉझिट जप्त झाले आहे, असे म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

बिहार निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी मोठा आनंदोत्सव करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. दिल्लीमधील कार्यालयात आनंदोत्सवासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.

दरम्यान भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधानांनी नाराजीही व्यक्‍त केली. मृत्यूचा खेळ खेळून मते मिळणार नाहीत असे यावेळी ते म्हणाले. बॅंक खाते, गॅस कनेक्‍शन, घर, स्वयंरोजगाराठी सुविधा, चांगले रस्ते, चांगल्या रेल्वे, रेल्वेस्थानके, उत्कृष्ट विमानतळं, नद्यावर उभारले जात असेलले अत्याधुनिक पूल, इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी आदी मुद्दे निवडणुकीत महत्वाचे नसतात. जनता अशा लोकांना वारंवार हे सांगत आहे की, खरे मुद्दे हेच आहेत. 

देशाचा विकास राज्याचा विकास आज सर्वात मोठी कसोटी आहे व येणाऱ्या काळातही हाच निवडणुकीचा आधार राहणार आहे. ज्या लोकांना हे समजतच नाहीत, त्यांची जागा काय झाले हे उघड आहे. जागोजागी त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

तसेच, आज देश भाजपावर जे प्रेम दाखवत आहे. त्याचे सर्वात मोठे कारण हेच आहे की, भाजपाने देशाच्या विकासाला लोकांच्या विकासाला आपले सर्वोतोपरी उद्दिष्ट बनवले आहे. असेही मोदींनी सांगितले.

यावेळी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. बिहारमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले असून 125 जागांवर विजय मिळाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.