नवी दिल्ली – आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आहे. गणरायाचे आगमन होत आहे. आज गणरायाची प्रतिष्ठापना केली जात आहे. प्रत्येकजन करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करत आहे .
याबाबत सरकारकडूनही देण्यात आल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेश चतुर्थीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!
— Narendra Modi (@narendramodi) September 10, 2021
त्यांनी ट्विट केले आहे की,’आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!’
गणेशोत्सवात करोना प्रतिबंधक नियम पुढील प्रमाणे पाळावेत
-गणेश मूर्ती विक्रीसाठी शाळांची पटांगणे, मोकळ्या जागेवर परवानगी देण्यात येणार आहे.
-पदपथावर गणेशमूर्ती विक्रीसाठी परवानगी दिली जाणार नाही.
-सार्वजनिक गणेश मंडळांची गणेशमूर्ती 4, घरगुती मूर्ती 2 फुटांपर्यंत असावी.
-महापालिका विसर्जन घाट व हौदांची व्यवस्था करणार नाही.
-गर्दी टाळण्याच्या पार्श्वभूमीवर अन्नदान आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांना मनाई