चेन्नई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी क्रिकेट सामना सध्या सुरू आहे. चेन्नईतील चेपॉकमध्ये सुरू असलेल्या सामन्याचा आजचा दुसरा दिवस असून भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला अवघ्या 134 धावा बाद करून सामन्यावर पकड निर्माण केली आहे. हा सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिली आणि त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी चेन्नईत खेळल्या जाणार्या दुसर्या सामन्याचा फोटो ट्विटरवर शेअर केला. पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरमधून जात असताना त्यांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केलं आणि त्याला सुंदर कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी हा फोटो आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
Caught a fleeting view of an interesting test match in Chennai. 🏏 🇮🇳 🏴 pic.twitter.com/3fqWCgywhk
— Narendra Modi (@narendramodi) February 14, 2021
या कसोटीमध्ये भारतीय संघाला यश मिळेल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. पहिल्या डावात रोहित शर्माच्या दीड शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 329 धावा केल्या. तर भारतीय संघाकडून रविचंद्रन अश्विनने पाच विकेट घेऊन इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत धाडला.