मुंबई – नुकतंच प्रदर्शित झालेला विवेक रंजन अग्निहोत्रीच्या ‘द कश्मीर फाईल्स’ची सध्या खूप चर्चा सुरू आहे. हा सिनेमा 1989 आणि 1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांवर भाष्य करणारा आहे. काश्मिरी पंडितांनी भोगलेल्या वेदना, दुःख आणि संघर्षावर प्रकाश टाकण्याचे काम या सिनेमातून झाले आहे. सध्या सोशल मीडियावर या सिनेमाला नेटकऱ्यांकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून, अनेकांना सिनेमा पाहून रडू कोसळल्याचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.
दरम्यान अशाप्रकारे प्रतिसाद मिळत असलेला सिनेमा आणखी एका कारणामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा सिनेमा आवडला असून त्यांनी या सिनेमाच्या टीमची भेट घेतली. कश्मीर फाइल्सचे प्रोड्युसर अभिनेषेक अग्रवाल यांनी याबाबत फोटो शेअर केले आहेत.
I am so glad for you @AbhishekOfficl you have shown the courage to produce the most challenging truth of Bharat. #TheKashmirFiles screenings in USA proved the changing mood of the world in the leadership of @narendramodi https://t.co/uraoaYR9L9
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) March 12, 2022
आपल्या पोस्टमध्ये अभिषेक अग्रवाल म्हणतात की.., ‘माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना भेटून आनंद झाला. #TheKashmirFiles बद्दलचे त्यांचे कौतुक आणि चांगले शब्द यामुळे ही भेट खास ठरली. याआधी कोणत्याही चित्रपटाची निर्मिती करताना एवढे अभिमानास्पद वाटले नव्हते.’ त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेत्री पल्लवी जोशी देखील दिसत आहेत.
‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमात या अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत.