अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद यांनी आज आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानाचे झायेद पारितोषिक जाहीर केले आहे. याबरोबर प्रिन्स शेख मोहम्मद बिन झायेद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे एक खास संदेश देखील लिहिला असून ते लिहितात, “भारत आणि युनायटेड अरब अमीरात यांच्या दरम्यान ऐतिहासिक संबंध असून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी माझे मित्र व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची पोचपावती म्हणून आम्ही त्यांना या पुरस्काराने सन्मानित करीत आहोत.”
Shaikh Mohammed bin Zayed, Crown Prince of Abu Dhabi and Deputy Supreme Commander of the UAE Armed Forces tweets that UAE President has awarded PM Narendra Modi with the Zayed Medal. pic.twitter.com/owXnP8BRqU
— ANI (@ANI) April 4, 2019