पंतप्रधान मोदींनी 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून घेतली कोविड स्थितीची माहिती

नवी दिल्ली, दि. 16 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा करून त्यांच्या राज्यातील कोविड स्थितीची माहिती करून घेतली. यावेळी उत्तरप्रदेश, राजस्तान, छत्तीसगड, आणि पदुच्चेरी या राज्यांचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

मात्र या चर्चेच्यावेळी मोदींनी काय निर्णय घेतला हे मात्र समजू शकलेले नाही. गेले काही दिवस पंतप्रधान हे विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून माहिती घेत आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यात होणारी ही चर्चा प्रसार माध्यमांसाठी खुली नसते त्यामुळे या चर्चेत नेमके काय होते याची कल्पना लोकांना येत नाही. त्यामुळे विविध राज्यांचे मुख्यमंत्री आपण पंतप्रधानांबरोबर झालेल्या चर्चेच्या वेळी राज्यातर्फे काय मागणी केली याची माहिती स्वतंत्रपणे देत असतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.