काठमांडू – बुद्ध पौर्णिमेनिमित्त बौद्ध संस्कृती आणि वारसा केंद्राच्या पायाभरणी समारंभात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नेपाळमधील लुंबिनी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी मायादेवी मंदिराला भेट देणार असून अशोक स्तंभाची मिरवणूकीत सहभागी होणार आहेत . बौद्ध धर्म मानणाऱ्यांची या मंदिरावर खूप श्रद्धा आहे. पूजेदरम्यान मोदींसोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि त्यांची पत्नीही उपस्थित राहणार आहेत.
चीनने बांधलेल्या विमानतळावर पंतप्रधान मोदी उतरलेच नाहीत
दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला नेपाळ दौरा आहे. मोदींचे विमान दिल्लीहून कुशीनगरला पोहोचले आणि नंतर कुशीनगर ते लुंबिनी, पीएम मोदींनी हेलिकॉप्टरने प्रवास केला. चीनने बांधलेल्या विमानतळावर न उतरून पीएम मोदींनी चीनला संदेश दिला असून हे पाऊल चीनची अस्वस्थता वाढवणार आहे.
भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लुंबिनी येथील मायादेवी मंदिरात प्रार्थना करण्याव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या बुद्ध जयंती कार्यक्रमात भाषण देखील करतील. लुंबिनीमध्ये चीनच्या आस्था असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा लुम्बिनी दौरा होत आहे. सुमारे एक दशकापूर्वी चीनने लुंबिनीला 3 अब्ज खर्च करून जागतिक शांतता केंद्र म्हणून विकसित केले. याशिवाय चीनची रेल्वे लुंबिनीमध्ये आणण्याबाबतही चर्चा झाली होती.