ढाका – संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार डॉ. मोहम्मद युनूस यांच्या भेटीचे कोणतेही नियोजन नसल्याचे बंगालादेशचे परराष्ट्र सल्लागार तौहिद हुसैन यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र या प्रसंगी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी आपली द्विपक्षीय चर्चा होणार असल्याचे हुसैन यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक सुधारण्याच्या दृष्टीने ही चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
भारत आणि बांगलादेशादरम्यानच्या सर्व मुद्यांवर सामोपचाराने संवाद साधण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न आहे. परस्पर आदर आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांमध्ये अधिक प्रगती करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.