दोन लाख रुपायांचा धनादेश सुपूर्द
डोर्लेवाडी- सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी म्हण प्रचलित आहे काही ठिकाणी असे होत असते; मात्र याला प्रधानमंत्री जनधन योजना अपवाद ठरली आहे. डोर्लेवाडी येथील मयत मल्हारी गोविंद शिंदे त्याच्या कुटुंबाला प्रधानमंत्री जनधन योजनेचा लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विम्याचा 2 लाख रुपये रक्कमेचा धनादेश देण्यात आला आहे.
मल्हारी गोविंद शिंदे (रा. डोर्लेवाडी) या युवकांनी काही महिन्यांपूर्वी डोर्लेवाडी येथील युनियन बॅंक डोर्लेवाडी येथे प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा 2 रुपयांचा विमा उतरवला होता. पण दुर्दैवाने मागील महिन्यापूर्वी त्याचा झारगडवाडी येथील टूले वस्ती येथे अपघाती मृत्यू झाला. त्याच्या मागे त्याची पत्नी व दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.दरम्यान, प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत युनियन बॅंक डोर्लेवाडी यांच्याकडून राणी मल्हारी शिंदे यांना छत्रपती सहकारी साखर कारखाना माजी संचालक नारायणराव मोरे, सरपंच बाळासाहेब सलवदे, शाखा प्रबंधक मकरंद नवले, उपशाखा प्रबंधक विभावरी शहा, कॅशियर पवन शेजूळ यांच्या हस्ते दोन लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी युनियन बॅंकेचे शाखा प्रबंधक मकरंद नवले यांच्याकडून असे सांगण्यात आले की, लोकांनी प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत जास्तीत जास्त युनियन बॅंकेतून विमा काढून आपले कुटुंब सुरक्षित करावे व याचा फायदा सर्वानी घावा, असे आवाहन करण्यात आले आहे.