नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुर्वांचल एक्स्प्रेसवे चे उद्घाटन झाले. सुलतानपूर जिल्ह्यातील एक्स्प्रेसवेवर बांधलेल्या 3.2 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवरून झालेल्या एअरशोचे अवलोकनही त्यांनी केले.
हा एक्सप्रेसवे उत्तम भविष्याकडे नेणारा मार्ग आहे. उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी असलेला हा एक्सप्रेसवे नवीन उत्तरप्रदेशची बांधणी करेल. उत्तर प्रदेशातील आधुनिक सुखसोयींचे प्रतिबिंब म्हणजे हा एक्सप्रेस वे आहे. उत्तर प्रदेशने घेतलेल्या संकल्पांच्या पूर्ततेचे प्रत्यक्ष पुरावा तसेच उत्तर प्रदेशचा अभिमान आणि आश्चर्य हा एक्सप्रेस वे आहे असे उद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले.
दशकानुदशके काही प्रदेश विकासाच्या मार्गावर पुढे आहेत तर काही प्रदेश मागे राहिले. देशासाठी ही असमानता चांगली नाही. भारताचा पूर्वेकडील प्रदेश आणि ईशान्येकडील राज्ये यांच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने अधिक क्षमता असूनही देशात घडून येत असलेल्या विकासाचा फायदा त्यांना फारसा झाला नाही. आता उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडील भागात विकासाचा नवीन अध्याय सुरू होत आहे असे त्यांनी सांगितले.