पेठ तालुका आंबेगाव – महाराष्ट्रात कोरोना सैनिक म्हणून डॉक्टर,नर्स, पोलीस,आरोग्य कर्मचारी यांच्या सह प्राथमिक शिक्षक देखील वेगवेगळ्या भूमिका बजावत आहेत. त्याप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुका प्रशासनाने शिक्षक, पोलीस,वन कर्मचारी यांची नाका बंदीवर नेमणूक केली आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्याने मुंबई, पुणे,महानगर पट्टा सर्वाधिक कोरोना ने बाधित आहे, या संकटाविरोधात डॉक्टर,नर्स, पोलीस,आरोग्य सेविका,आशा वर्कर यांच्याबरोबर आंबेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षकदेखील चेक नाक्यावर रात्रभर आपली ड्युटी बजावत आहेत.
निवडणुका, जनगणना, आपत्ती व्यवस्थापन असो कि सरकारची कोणतीही महत्वाची योजना असो ती राज्याच्या शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवायची असेल तर शिक्षकच वेळोवेळी धावून आला आहे, त्याचप्रमाणे आत्ताही तो कधी चेक पोस्ट वर,कधी सर्वेक्षण, कधी रेशनींग वाटप,शालेय पोषण आहार तांदूळ वाटप हि कामे करतच आहे.
आंबेगाव तालुक्यातील शिक्षक गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या नियुक्ती च्या गावात दैनंदिन कोरोना सर्व्हेक्षणाचे काम प्रामाणिकपणे करुन त्याचा अहवाल ग्रामपंचायत मार्फत आरोग्य विभागाला सादर करत आहेत,चेक पोस्ट ड्युटीवर 300 तर रेशनींग वाटप साठी 120 शिक्षक काम करत आहेत परिणामी तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही यामध्ये इतर शासकीय यंत्रनेबरोबर प्राथमिक शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. अशी माहिती आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सचिन तोडकर व सरचिटणीस सुनील भेके यांनी दिली.