कोल्हापूर – कागल तालुक्यातील बोरवडे येथील ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदीरातील मुख्य पुजारी यांचे पुजेची तयारी करतेवेळी ह्लदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. जोतिराम शामराव गुरव (वय 42) असे निधन झालेल्या पुजाऱ्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी पहाटे घडली. ऐन दसऱ्याच्या तोंडावरच घटस्थापनेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोरवडे येथे दसरा महोत्सव परिसरात मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. पहाटे सहा वाजताच्या दरम्यान येथील जोतिर्लिंग मंदीरात जोतिराम गुरव पुजेची तयारी करत होते. यावेळी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांची प्रमाणज्योत मालवली.