पुण्याच्या बाजारात पालेभाज्यांच्या भावात घसरण सुरूच

बाजारात हरभरा जुडीची आवक सुरू

 

पुणे – पालेभाज्यांची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने मुळेवगळता सर्वच पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली आहे. बाजारात हरभरा जुडीची आवक सुरू झाली आहे. रविवारी 20 हजार जुडींची आवक झाल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

 

रविवारी येथील बाजारात पावणेदोन लाख जुडी कोथिंबिरीची आवक झाली. जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. मेथीची आवक वाढली असून, सव्वालाख जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्यात 80 हजार जुडी होती. घाऊक बाजारात कोथिंबीर, चाकवत, पुदीना, चवळईच्या भावात जुडीमागे प्रत्येकी दोन रुपयांची घट झाली आहे. तर मेथी, करडई, राजगिरा आणि पालकच्या भावात जुडीमागे एक रुपयांची घसरण झाली आहे. अंबाडीच्या भावात जुडीमागे तीन रुपयांची घट झाली आहे. तर, केवळ मुळेच्या भावात मात्र तीन रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

 

 

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : 100-400, मेथी : 100-400, शेपू : 100-300, कांदापात : 1200-1500, चाकवत : 200-300, करडई : 500-600, पुदिना : 100-200, अंबाडी : 200-300, मुळे : 800-1300, राजगिरा : 200-400, चुका : 400-500, चवळई : 400-500, पालक : 200- 400, हरभरा गड्डी 800 ते 1200.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.