शामली – उत्तरप्रदेशच्या शामली जिल्ह्यातील मार्केटमध्ये केवळ १ रुपया किलोने फ्लॉवरला भाव मिळाल्याने नाराज शेतकऱ्याने १५ एकर जमिनीवर ट्रॅक्टर फिरवला आहे. सोबतच त्यांनी २० दिवसांपासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिले आहे. तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक असल्याचे म्हणत रद्द करण्याची मागणीही केली आहे.
शामलीस्थित कैराना परिसरात दोन शेतकऱ्यांनी बुधवारी आपल्या १५ एकरावरील फ्लॉवरवर ट्रॅक्टर फिरवला. मायापुरचे रहिवासी असलेले शेतकरी रमेश यांनी सांगितले कि, आपल्या शेतात जवळपास ५ एकरावर चांगल्या प्रतीच्या फ्लॉवरचे उत्पादन घेतले होते. मागील काही दिवसांमध्ये ७६ फ्लॉवर दिल्लीच्या मार्केटमध्ये विक्रीस घेऊन गेले. परंतु, अनेक दिवस उलटूनही तेथे फ्लॉवरला भाव मिळाला नाही. जास्त दिवस झाल्याने फ्लॉवरही खराब झाला.
तसेच, अन्य मार्केटमध्ये त्यांच्या फ्लॉवरला केवळ एक रुपया भाव मिळाला. तर फ्लॉवरच्या उत्पादनासाठी जवळपास ४ ते ५ हजारापर्यंत एकरी खर्च येतो. यामुळे नाराज होऊन शेतकऱ्याने एक लाखाच्या फ्लॉवरवर ट्रॅक्टर फिरवला.
Shamli: A farmer in Mayapuri village destroyed his cauliflower crop as he was getting Rs 1/kg price for them.
“I was getting Rs 1/kg for cauliflower & 76 bags remained unsold. So, I decided to destroy rest of it…All 3 farm laws should be taken back,” says Ramesh, a farmer. pic.twitter.com/6qEFgPVc1J
— ANI UP (@ANINewsUP) December 17, 2020
याचप्रकारे झाडखेडी गावातील शेतकरी तनवीर यांनीही आपला १० एकरातील फ्लॉवरवर ट्रॅक्टर फिरवला. उत्पादन खर्चही निघत नसेल तर शेतीच नष्ट करणे योग्य आहे, असे तनवीर यांनी म्हंटले आहे. १० एकरातील फ्लॉवरची किंमत जवळपास दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शहरातील मार्केटमध्ये फ्लॉवरला प्रति किलोग्रॅम १० ते १५ रुपये भाव मिळत आहे. तर दिल्ली, नोएडा आणि अन्य मोठ्या शहरांमध्ये फ्लोरवरला प्रति किलोग्रॅम ३५ ते ४० रुपये आणि कोबीला प्रति किलोग्रॅम २० ते २५ रुपये ग्राहकांना विक्री केली जात आहे.