मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या निमित्ताने एकीकडे केंद्र विरूद्ध राज्य असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे दिवसागणिक डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहचवणाऱ्याच आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ग्राहकांना आता सीएनजीच्या वापरासाठी आज मध्यरात्रीपासून जास्त पैसे मोजावे लागणार आहे.
सीएनजीच्या दरातही काही महिन्यांत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा प्रति किलो 4 रूपयांनी सीएनजी गॅस महागला आहे. याची अंमलबजावणी मुंबई आणि महानगरात मध्यरात्रीपासून होणार आहे.
महानगरने कॉम्प्रेस्ड नॅच्युरल गॅसच्या किंमती प्रति किलो 4 रूपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या किंमती मुंबई आणि परिसरासाठी लागू असतील. 29 एप्रिलच्या मध्यरात्री पासूनच या नव्या किंमती अंमलात येतील. त्यामुळे पुण्यात सीएनजीसाठी आता 77.20 रुपये प्रति किलो असा दर ग्राहकांना मोजावा लागणार आहे. एमजीएलने पीएनजीच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.