आपल्याला विधानसभेत जाण्यापासून रोखले….

राज्यपाल जगदीप धनखर यांचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनगर यांच्यात मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यातच आज राज्यपाल धनखर यांनी आपल्याला विधानसभेत जाऊ दिले नसल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी हा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला आहे.


मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री ममत बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यात त्यांच्या अधिकारावरून शाब्दिक चकमक सुरू आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांचे केंद्रातील सरकारसोबतच्या तणावाचा परिणाम हा राज्यपालांसोबत असणाऱ्या संबंधावर पडत असल्याचे चित्र सध्या राज्यात पहायला मिळत आहे. त्यातच आज राज्यपाल धनखर यांनी आपण पुर्वसूचना देऊन देखील विधानसभेचे तीन नंबरचे गेट बंद ठेवण्यात आले होते. तसेच राज्यपालांच्या प्रवेशासाठी असलेले गेट बंद ठेवणे हा लोकशाहीच्या इतिहासातील अपमानास्पद घटना असल्याचेही राज्यपालांनी म्हटले आहे.

दरम्यान, तीन नंबरचे गेट बंद असल्याने राज्यपालांना सर्वसामान्य आणि माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी असणाऱ्या गेटने विधानसभेत प्रवेश करावा लागला. तर मागील महिन्यात राज्यात चित्रपट महोत्सवाचे निमंत्रण न दिल्यानेही राज्यपाल आणि मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्यात तणावपुर्ण वातावरण निर्मिती झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.