पणजी – देशाला स्वातंत्र्यचे ७५वे वर्ष साजरे करत आहे. देशभरात आनंदाचे वातावरण आहे. असं असताना स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावर आणि आनंदावर विरजण टाकणारी घटना गोव्यात घडली आहे.
गोव्यातील ज्यासींटो आइसलँडवर काही लोकांनी भारतीय नौदलाला तिरंगा फडकवण्यापासून रोखलं आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे, शिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावतं यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी संध्याकाळी गोव्यातील ज्यासींटो आइसलँड या याठिकाणी ही घटना घडली आहे. तिरंगा फडकवण्याच्या कार्यकमाचा भारतीय नौदलाकडून सराव सुरू होता.
तेव्हा काही लोकांनी त्यांना राष्ट्रध्वज फडकवण्यापासून रोखले. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्त करत गोवा पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
It is unfortunate and shameful that some individuals at St Jacinto Island have objected to Hoisting of the National Flag by the Indian Navy on the occasion of India’s Independence Day. I condemn this and want to state on record that my Government will not tolerate such acts.1/2
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) August 13, 2021
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘हे दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘मी भारतीय नौदलाला अशी विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या मुख्य योजनेप्रमाणेच पुढे जावे. त्यांना गोवा पोलिसांच्या पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले आहे. भारतविरोधी कारवाईच्या प्रयत्नांना पोलादी मुठीने सामोरे जावे लागेल. राष्ट्र नेहमीच प्रथम असेल.’