ग्राहक पंचायततर्फे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि खासदार बापट यांना निवेदन..
पुणे(प्रतिनिधी) – ग्राहक मंचाची स्वतंत्र इमारत उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून त्यासाठी केंद्र शासनाने 10 कोटी 70 हजार एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आहे. मात्र, करोनामुळे नवीन बांधकाम सुरू न करण्याच्या सूचना राज्य शासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. हा निधी परत गेला तर नामुष्की ओढवू शकते. त्यामुळे हा निधी परत जाण्यापासून रोखवा, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमार्फत करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन पंचायतीतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट याना निवेदन देण्यात आल्याची माहिती पंचायतीचे श्रीकांत जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
तक्रार दाखल केल्यापासून 90 दिवसात ग्राहकाला न्याय मिळणे क्रमप्राप्त आहे. मात्र, पुणे ग्राहक मांचाला स्वतंत्र्य जागा उपलब्ध नसल्याने आणि अपुऱ्या सोयी – सुविधांमुळे न्याय मिळण्यास विलंब लागत होता. तत्कालीन भाजप सरकारने ग्राहक मांचासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यासाठी जागा निश्चित केली होती. मात्र, सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
त्याच धर्तीवर राज्यात निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीमुळे नवीन बांधकाम सुरू न करण्याच्या सूचना सार्वजनीक बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने मंजूर केलेला हा निधी परत गेला तर ग्राहक मंचाच्या स्वतंत्र इमारतीचे काम पुन्हा लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे हा निधी परत जाण्यापासून रोखवा, असे या निवेदनात म्हटले आहे.