थेट अंडरवर्ल्ड डॉनशी भिडली होती प्रीती झिंटा

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिचा आज वाढदिवस. प्रीतीने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण एक वादग्रस्त म्हणा किंवा प्रीतीच्या साहसाचा किस्सा म्हणा आजही सर्वांच्या लक्षात आहे. हा किस्सा तेव्हाचा आहे. जेव्हा प्रीतीने थेट अंडरवर्ल्ड डॉनशी टक्कर घेत त्याच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिली होती. हा किस्सा घडला होता तो 2001मध्ये प्रदर्शित झालेल्या “चोरी-चोरी, चुपके-चुपके’ चित्रपटावेळी.

सूत्रांच्या माहितीनुसार अब्बास मस्तान “चोरी-चोरी, चुपके-चुपके’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. या चित्रपटात प्रीति झिंटा, राणी मुखर्जी आणि सलमान खान प्रमुख भूमिकेत होते. कागदोपत्री या चित्रपटाची निर्मिती हिरा व्यापारी भरत शाह आणि प्रोड्युसर नाजिम रिजवी करत असल्याचे दाखवण्यात आले होते. पण प्रत्यक्षात मात्र या चित्रपटाच्या निर्मितीसाठी अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा पैसा लागला होता.

याबाबत सलमान खान, शाहरुख खान, राकेश रोशन यासारख्या व्यक्तींनी काही बोलण्यास नकार दिला होता. मात्र प्रीतीने छोटा शकीलच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिली होती. प्रीतीने आपल्याला वारंवार धमक्‍यांचे फोन येत असल्याचे साक्ष दिली होती. न्यायालयाने प्रीतीला याबाबत साक्ष देण्यासाठी बोलवले होते. हे प्रकरण अंडरवर्ल्डशी जोडले गेले असल्याने प्रीतीची साक्ष रेकॉर्ड करण्यात आली आणि त्यानुसार भरत शाहला अटक करण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.