जीवनसाथी डॉटकॉमवर डॉक्‍टर असल्याचे भासवून तरुणीला गंडा

पुणे -कौंढवा परिसरात राहणाऱ्या एका वर्षीय तरुणीला लग्नासाठीचे जीवनसाथी डॉटकॉम या वेबसाईटवर एका भामटयाने परदेशात डॉक्‍टर असल्याचे भासवून तिची 36 हजार रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी संबंधित तरुणीने कौंढवा पोलीस ठाण्यात आरोपी डॉ.विवेक देशपांडे (35,रा.यु.के.) व त्याची साथीदार अनिता (रा.दिल्ली) यांचे विरोधात तक्रार दिली आहे.

तक्रारदार तरुणीच्या वडीलांनी मुलीच्या लग्नासाठी जीवनसाथी डॉटकॉमवर नाव रजिस्टर केले होते. त्यानंतर यु.के.येथून डॉ.विवेक देशपांडे नावाच्या भामटयाने त्यांच्याशी संर्पक करुन आपण लग्न करण्यास इच्छुक अ्रसल्याचे सांगितले.

तरुणीशी व्हॉटसअप कॉलद्वारे ओळख वाढवून तिच्या आईच्या 23/4/2021 रोजी झालेल्या वाढदिवसाचे गिफ्ट दिल्लीत पाठविल्याचे सागंतले. परंतु त्याठिकाणी कस्टम अधिकाऱ्यांनी गिफ्ट क्‍लिअर करण्यासाठी अनिता नावाचे महिलेने अमितकुमार यांचे युनियन बॅंक ऑफ इंडियाचे बॅंक खात्यावर 36 हजार रुपये भरण्यास सांगून गिफ्ट न पाठवता, अथवा पैसे परत न करता फसवणुक केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.