जर्मनीमध्ये मानवी तस्करीविरोधात छापासत्र; देहविक्रयास भाग पडणाऱ्या दोन महिलांना अटक

बर्लिन – शरणार्थ्यांच्या संघटित तस्करीविरोधात जर्मन फेडरल पोलिसांनी सोमवारी अनेक शहरांमध्ये छापे घातले. सकाळी 6 वाजतापासून बर्लिन, हॅम्बुर्ग आणि उत्तर राईन वेस्टफालिया, सॅक्‍सोनी-अन्हाल्ट आणि सक्‍सेनी तसेच स्लोव्हाकियाची राजधानी ब्रॅटिस्लावा येथील 33 ठिकाणी एकाच वेळी तपासणी केली गेली, असे “क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट’च्या प्रवक्‍त्याच्या हवाल्याने स्थानिक वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या कारवाईचे मुख्य लक्ष असलेल्या बर्लिनमध्ये सुमारे 700 अधिकारी तैनात करण्यात आले होते. व्हिएतनामी नागरिक असलेल्या दोन मुख्य संशयितांपैकी एकाला बर्लिनमध्ये अटक करण्यात आली. तर ब्रॅटिस्लावामध्ये आणखी एकाला अटक करण्यात आली. हे दोन्ही आरोपी म्हणजे महिला असून त्या तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत.

त्यांच्यावर स्लोव्हाकियातील फ्लॅटद्वारे व्हिएतनामहून जर्मनीत लोकांची तस्करी केल्याचा आरोप आहे. या लोकांकडून 13,000 ते 21,000 युरो (15,850- 25,600 डॉलर) इतक्‍या रकमेची मागणी केली जात असायची.

या व्यक्‍तींना मसाज पार्लर किवा वेश्‍यागृहात काम करण्यास भाग पाडले जात असे. त्यांच्या कामाच्या मोबदल्यातून त्यांचे देणे वसूल केले जात असे, असे प्रवक्‍त्याने सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.