राज्यातील राष्ट्रपती राजवट संपुष्टात; अधिसूचना जारी 

नवी दिल्ली – भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे सत्तासमीकरण अस्तित्वात आल्यानंतर राज्यातून राष्ट्रपती राजवट हटविण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. राजभवनात ८ वाजून ५ मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

दरम्यान, राज्यात २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी लोकसभा निवडणूक पार पडली होती. २४ ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर कोणत्याही पक्षाने सत्तास्थापनेसाठी दावा न केल्याने १२ नोव्हेंबरपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.