पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी (पुणे) चे विशेष पोलीस महानिरीक्षक व संचालक डॉ. राजेंद्र डहाळे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
डॉ. डहाळे यांना यापूर्वीही २०१७ मध्ये नंदूरबार पोलीस अधीक्षक असताना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले होते. त्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी पुणे शहरात सायबर पोलीस उपायुक्त म्हणूनही कार्य केले आहे.
सायबर फॉरेन्सिक लॅबच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, त्यांनी पुण्याचे अपर पोलीस आयुक्त म्हणूनही कार्यभार सांभाळला होता.
या काळातील गणेशोत्सव व इतर कायदा व सुव्यवस्था उत्कृष्ट ठेवल्याबद्दल त्यांचा वरिष्ठ अधिकार्यांनी वेळावेळी सन्मान केला होता. डॉ. डहाळे यांनी यापूर्वी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, राज्य गुप्तवार्ता विभाग व इतर विभागांत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.