President’s Medal – पोलीस व कारागृह प्रशासनातील उल्लेखनीय, निष्ठावान आणि आदर्श सेवेसाठी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रपती पदकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. या घोषणेमुळे पोलीस व कारागृह विभागात समाधानाचे वातावरण आहे. राष्ट्रपतीपदक प्राप्त अधिकारी – उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद सदाशिव गावडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिट), पोलीस निरीक्षक अविनाश शंकरराव शिळीमकर (पुणे ग्रामीण), लेखणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सावंत (एसआरपीएफ, गट १, पुणे), सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल खंडुजी कुबाडेपिंपरी-चिंचवड उल्लेखनीय सेवेबाबतचे पदक अशोक शिवराम कारकर (अधीक्षक, भायखळा जिल्हा कारागृह), गोविंद केशव राठोड (अतिरिक्त अधीक्षक, तळोजा मध्यवर्ती कारागृह), राजेंद्र भाऊसाहेब धनगर (हवालदार, येरवडा खुले जिल्हा कारागृह), सुनील भाऊसाहेब लांडे (हवालदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह), प्रल्हाद महिपती शिंदे (हवालदार, लातूर जिल्हा कारागृह), विजय बाबाजी परब (सुभेदार, ठाणे मध्यवर्ती कारागृह), राजू विठ्ठलराव हाते (हवालदार, नागपूर मध्यवर्ती कारागृह) या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि उत्कृष्ट कार्यप्रदर्शन दाखवत प्रशासनाची प्रतिमा उंचावली आहे.