Abhijit Bichukale : राष्ट्रपतीपदाचा उमेदवार अभिजीत बिचुकले सध्या पुण्यात विकतोय ‘कंदी पेढे’

साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार

पुणे – कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे “अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यानं प्रयत्न केले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अभिजित बिचुकले यांनी आव्हान दिल. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या  विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली. सतत चर्चेत असणारे बिचकुले सध्या करतात तरी काय? असा सवाल अनेकांना पडला आहे. तर आज आम्ही या प्रश्नचं उत्तर घेऊन आलो आहे.

अभिनजीत बिचकुले यांनी नुकतंच पुण्यात स्वतःचा ‘सातारा कंदी पेढे’ विक्री व्यवसाय सुरू केलाय. त्यामुळे साताऱ्याच्या प्रसिद्ध कंदी पेढ्यांची चव आता पुणेकरांना बिचुकलेच्या दुकानात चाखायला मिळणार हे नक्की. अभिजित बिचकुलेनं पुण्यातील शारदा गणपती मंदिराजवळ आपलं कंदी पेढ्यांचं दुकान थाटलं आहे.

आजवर केलेल्या आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे त्यानं अनेकांचं लक्ष्यही वेधून घेतलंय. अभिजित बिचुकले हे मूळचे सातारा जिल्ह्यातले आहेत. “2019 चा मुख्यमंत्री मीच ठरणार’ , ‘सातारा माझी गादी मी छत्रपतींचा वैचारिक वारसदार’ ,  ‘कवी मनाचा नेता!’ अशी अनेक वक्त्यव्य अभिजित बिचकुले यांनी केलेली पाहायला मिळतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.