नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पहाटे योगासनं केली. तसेच ट्विटरव्दारे सर्व भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Greetings on #InternationalYogaDay.
The ancient science of Yoga is India’s great gift to the world.
Glad to see more and more people adopting it.
Amid stress and strife, especially with #Covid19, practicing Yoga can help keep the body fit and mind serene. pic.twitter.com/1ZGqsTnn4A
— President of India (@rashtrapatibhvn) June 21, 2020
राष्ट्रपतींनी ट्विट करत म्हटलं आहे की, प्राचीन योगा ही मानवतेला भारताची अमूल्य भेट आहे. जगभरातील अधिकाधिक लोक योगासनं करत आहेत हे पाहून मलाआनंद होतोय. संघर्ष आणि तणाव तसेच कोविड-19 संकटाशी सामना करताना श्वसनसंस्था मजबूत करण्यासाठी योगाभ्यास उपयोगी ठरेल, असं त्यांनी म्हटलं आहे.