नवी दिल्ली, दि. 26 – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना छातीत दुखत असल्याने त्यांना येथील लष्करी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली.
त्यांना तेथे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून तेथे त्यांची नियमीत स्वरूपाची वैद्यकीय चाचणी केली जात आहे, असे रूग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रपतींची प्रकृती आता स्थीर आहे, असेही रूग्णालयाच्या मेडिकल बुलेटिन मध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या आजाराच्या संबंधात जादा तपशील मात्र देण्यात आलेला नाही.