मालीमध्ये अध्यक्ष, पंतप्रधानांची सुटका

बोमाको,(माली)  – मालीचे हंगामी अध्यक्ष आणि पंतप्रधानांना सोडण्यात आले आहे, असे एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. ताब्यात घेतल्याच्या तीन दिवसानंतर गुरुवारी ही सुटका करण्यात आली. 

या दोघांचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत. नऊ महिन्यांत देशातील दुसरे बंड आहे. हंगामी अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्या सुटकेमुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची प्रमुख मागणी पूर्ण झाली, परंतु नागरी सरकार तातडीने परत स्थापन करण्याची मागणी मान्य झाली नाही.

अंतरिम अध्यक्ष आणि पंतप्रधानांना पहाटे दीडच्या सुमारास सोडण्यात आले. अध्यक्ष बह एनडॉ आणि पंतप्रधान मोतार ओआन यांना मुक्त करण्यात आल्याच्या वृत्ताचे कुटुंबियांनी समर्थन केले आहे. त्यांच्या सुटकेबाबत परिस्थिती स्पष्ट झालेली नाही.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लष्कराने केलेल्या बंडानंतर अध्यक्ष इब्राहिम बोबकर कीता यांचे सरकार उलथवून टाकण्यात आले.

भ्रष्टाचार आणि जिहादी बंडखोरी रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्यामुळे तरुण सैन्याच्या अधिकाऱ्यांनी कीता यांना अध्यक्षपदावरून घालवून दिले होते.

मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या हंगामी सरकारमधील अध्यक्ष आणि पंतप्रधानांनाही लष्कराने सोमवारी ताब्यात घेऊन त्यांना पदच्युत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.