लीलाताई येळवंडे, सुरेखा जामदार यांची नियुक्ती
संस्थेचे सचिव चंदन पानसरे यांनी दिली माहिती
चिंबळी (वार्ताहर) – निघोजे (ता. खेड) येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी लीलाताई शांताराम येळवंडे तर उपाअध्यक्षपदी सुरेखा दिलीप जामदार यांची बिनविरोध निवड झाल्याचे संस्थेचे सचिव चंदन पानसरे यांनी सांगितले.
निघोजे येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या सर्व सदस्यांना काम करण्याची संधी मिळावी या हेतूने संस्थेचे अध्यक्ष विकास येळवंडे व उपाअध्यक्षा राणी फडके यांनी स्वखुशीने राजीनामा दिला होता. त्यामुळे या रिक्त जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी जे. बी. मुलाणी यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी लिलाताई येळवंडे तर उपाध्यक्ष पदासाठी सुरेखा जामदार यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी मावळते अध्यक्ष विकास येळवंडे, उपाध्यक्षा राणी फडके, संचालक पोपट येळवंडे, स्वामी येळवंडे, वामन मराठे, धनाजी येळवंडे, चद्रंकात बेंडाले, किसन येळवंडे, बाळासाहेब भंडलकर, गजानन फडके, विष्णू बेंडाले, संतोष लिंभोरे उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्याक्षांचा सत्कार खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व आदि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी उपसरपंच रामदास येळवंडे, काळुराम कान्हुकर, बाळासाहेब येळवंडे, गजानन येळवंडे आदी मान्यवर उपस्थित होते.