नवी दिल्ली –लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर नरेंद्र मोदी यांचा आज शपथविधी होणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज नेतेमंडळी आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी किरगिझस्तानचे राष्ट्राध्यक्ष ‘सूरोनबे जीनबेकोव’ देखील राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत.
President of Kyrgyzstan, Sooronbay Jeenbekov arrives in Delhi. He will attend PM Narendra Modi's oath ceremony at Rashtrapati Bhawan later today. pic.twitter.com/W9TELh12Ma
— ANI (@ANI) May 30, 2019
दरम्यान, आज शपथविधी सोहळ्याला सुमारे 8 हजार पाहुणे उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आदी विरोधी पक्षनेत्यांबरोबरच बिमस्टेक देशांचे प्रमुख, उद्योगपती, चित्रपट तारे, विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असेल.