राष्ट्रपतींकडून सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीस मान्यता

सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता 34

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोच्च न्यायालयात चार नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीस मान्यता दिली आहे. त्यात न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती एस. रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती व्ही. राम सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांचा समावेश आहे. नवीन न्यायाधीशांच्या नियुक्तीबरोबरच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या आता 34 झाली आहे. ही संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या क्षमतेनुसार आहे आणि प्रथमच ती सर्वाधिक संख्या आहे.

अलीकडेच संसदेने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्षमता 31 वरून 34 केली. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमद्वारे नुकत्याच केंद्राकडे पाठविलेल्या न्यायाधीशांच्या शिफारसीला केंद्र सरकारने मान्यता दिली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची एकूण संख्या दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचे विधेयक नुकतेच लोकसभा आणि राज्यसभेने मंजूर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.