स्थायी समितीकडून 780 कोटींचे अंदाजपत्रक महासभेला सादर

कचरामुक्‍त शहर, बीओटीवर गाळे उभारणे आदी शिफारशी  

नगर – महापालिका प्रशासनाने सन 2019-20 चे 757 कोटी 2 लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले होते. त्यात स्थायी समितीने वाढ करून विविध शिफारशीसह आज 780 कोटी 55 लाखांचे अंदाजपत्रक महापालिकेच्या महासभेत महापौर बाबासाहेब वाकळे यांच्याकडे सादर केले. या अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी आज सभा तहकुब करण्यात आली असून उद्या दुपारी 1 वाजता ही सभा होणार आहे.

महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आज महासभा झाली. त्यावेळी स्थायी समितीचे सभापती मुदस्सर शेख यांनी महापौरांकडे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात विविध योजना सुचविण्यात आल्या आहेत. त्यात संकलित कराची प्रभावी वसुली, जीआयएस प्रणालीचे काम संथ गतीने होत असल्याने तो ठेका रद्द करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रिव्हिजन करून घरपट्टी आकरण्याचे काम करावे, गाळ्याचे बीओटीवर बांधकाम करणे, खासगी करणाच्या माध्यमातून चौक सुशोभिकरण, प्रभाग विकास निधी, घरकुल योजना आदी नव्याने योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

यावेळी स्थायी समितीने अनेक तरतूदीमध्ये वाढ सुचविली असून काही कमी केल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने सुचविलेल्या 757 कोटी 2 लाख रुपये अंदाजपत्रक आता थेट 780 कोटी 55 लाखापर्यंत गेले आहे. अर्थात स्थायी समितीला कोणता साक्षात्कार झाला. महापालिकेचे उत्पन्न एवढे कसे वाढणार याचा कुठूलाही संर्दभ न देता केवळ खर्चाच्या बाकी वाढविण्यात आल्या आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या अंदाजपत्रकीय सभेत यावर वादळी चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here