वॉशिंग्टन: अमेरिकेच्या सर्वोच्च सभासदांनी अमेरिकन कॉंग्रेसमध्ये एक ठराव मंजूर केला. ज्यामध्ये गुरुनानक देव यांच्या 550 व्या प्रकाश पर्वाचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्वांना मान्यता देणे आणि अमेरिकन शीखांनी देशाला दिलेल्या योगदानाला सन्मान देण्याचे म्हटले आहे. शीख धर्माचे संस्थापक, गुरू नानक यांच्या 550 व्या प्रकाश पर्वासमोर सादर केलेल्या या प्रस्तावात असे म्हटले आहे की, गुरू नानक यांनी दिलेली समानता, सेवा आणि भक्ती या मूल्ये व विचारांचे अमेरिकेत आणि जगभरात पालन होते.
शुक्रवारी सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक सिनेटर्स डिक डर्बिन, बॉब मेनंडेझ आणि बेन कार्डिन यांनी हा प्रस्ताव मांडला. तर प्रतिनिधी सभागृहात हा प्रस्ताव रिपब्लिकन कॉंग्रेसचे सदस्य ग्रेग पेंस, डेमॉक्रॅटिक पक्षाचे पीटर विस्क्लावस्की यांनी मांडला.
डर्बिन म्हणाले, अमेरिकन शीख नागरिकांनी अमेरिकेची सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विविधता समृद्ध केली आहे. यासह, त्यांनी आमच्या सैन्य दलांचे एक सदस्य म्हणूनही काम केले आहे आणि शेती, माहिती तंत्रज्ञान, आतिथ्य, ट्रक ड्रायव्हिंग आणि औषधोपचारात त्यांचे योगदान दिले आहे.