पुणे – शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांची 550वी जयंती साजरी होत असुन, यानिमित्त शहरातील गणेश पेठ येथील गुरुद्वारा ते कॅम्प गुरुद्वारा असे नगरकिर्तन दरबार (मिरवणूक) आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीमध्ये शीख समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
दरम्यान, यावेळी युवक आणि युवतींनी पारंपरिक तलवार बाजीचे सादरीकरण केले. गणेश पेठेतून निघालेल्या या नगरकिर्तनामध्ये अनेक समाजाचेही बांधव उपस्थित होते.