अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आयुक्‍तांसमोर विकास आराखड्याचे सादरीकरण

नगर – पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथील नगररचना शाखेतील विद्यार्थ्यांनी पिंपरी चिंचवड शहराचा विकासाचा आराखडा तयार करून दिला. याची माहिती मिळाल्यानुसार सदरच्या विद्यार्थ्यांना नगर महानगरपालिकेत शहराच्या विकासाच्या दृष्टिने विकास आराखड्याबाबत माहिती देण्याकरिता बोलविण्यात आले. या विद्यार्थ्यांचा समूह समर ट्रेनिंगसाठी नगर शहरात दाखल झाला आहे.

या महाविद्यालयातील नगररचना शाखेतील विद्यार्थ्यांना शहराच्या विकासाच्या दृष्टिने शिक्षण दिले जाते. यामध्ये शहराचे वाहतूक नियोजन, घनकचरा नियोजन, पाणी पुरवठा नियोजन, सिवरेज सिस्टीम, जीआयएस सॉफ्टवेअर वर आधारित शहराचा बेस मॅप, झोपडपट्टी पुनर्वसन, पर्यावरण पुरक योजना इत्यादीचे शिक्षण दिले जाते. याबाबत प्रभाग क्र. 6 मधील सर्व्हे करून विद्यार्थ्यांनी केलेंल्या कामकाजाचे प्रेजेंटेशन आयुक्‍त यांचे समोर सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत महापौर बाबासाहेब वाकळे उपस्थित होते.

हा विद्यार्थी समूह “समर ट्रेनिंग’ मधील विद्यार्थ्यांनी केलेल्या कामकाजाचा आढावा आयुक्तांनी घेतला. विद्यार्थ्यांनी नागरिकांना आवश्‍यक असणाऱ्या नागरी सुविधेशी निगडीत असणाऱ्या कामांबाबत प्रभाग क्र. 6 मध्ये फिरून संपूर्ण प्रभागाचा सर्व्हे केला. नागरिकांशी संवाद देखील साधला. विकास आराखडा तयार करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामकाजाची माहिती घेतली. विद्यार्थी करित असलेल्या प्रोजेक्‍टमध्ये काही दुरुस्त्या व सूचना सुचविल्या आणि करित असलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी माहिती देताना सांगितले की, शहराचा सुनियोजित आराखडा तयार करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टिने हे विद्यार्थी विकास आराखडा तयार करणार आहेत. सदरील विद्यार्थी प्रभाग क्रमांक 6 मधील सर्व्हे केला असून नागरिकांच्या नागरी सुविधे बाबत विकास आराखडा तयार करीत आहेत. त्यात काही दुरुस्त्या व सूचना जिल्हाधिकरी यांनी दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.