“दृश्‍यम 2′ हिंदीत बनवण्याची तयारी

2015 मध्ये रिलीज झालेल्या आणि अजय देवगणचा लीड रोल असलेल्या “दृश्‍यम’ चा सिक्‍वेल बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. 2013 मध्ये मल्याळममध्ये “दृश्‍यम’ याच नावाने बनलेल्या सिनेमाचा रिमेक अजय देवगणने हिंदीमध्ये केला होता. आता मल्याळममध्ये “दृश्‍यम 2′ प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला आहे.

त्यामुळे हिंदीतही त्याचा सिक्‍वेल बनवण्याची हालचाल सुरू झाली आहे. अजय देवगणचे निकटवर्तीय असलेल्या कुमार मंगल यांनी या सिक्‍वेलचे अधिकार विकत घेतले आहेत. मल्याळममधील “दृश्‍यम 2’चा रिमेकच हिंदीमध्ये ते बनवणार आहे. मल्याळममधील दोन्ही सिनेमांचे दिग्दर्शन जीतू जोसेफ यांनी केले होते आणि दोन्ही सिनेमांमध्ये लीड रोल मोहनलाल यांनी केला आहे.

अजय देवगणच्या “दृश्‍यम’चे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. निशिकांत कामत यांचे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले आहे. त्यामुळे “दृश्‍यम 2’च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अन्य कोणावर सोपवली जाईल. सध्या अजय देवगण “रुद्र’ या वेबसिरीजमध्ये काम करतो आहे. “रुद्र’चे काम संपल्यावर याच वर्षी “दृश्‍यम 2′ चे शुटिंग सुरू होणे अपेक्षित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.