पारनेरचा प्रलंबित पाणीप्रश्न सोडविण्यासाठी जेलभरोची तयारी ठेवा

अण्णा हजारे यांचे आवाहनः “आम्ही पारनेरकर सामाजिक विचारपीठ’ देशाला नवी दिशा देईल

पारनेर – तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील भूमिपुत्रांनी एकत्र येत पाणीप्रश्न व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी सुरू केलेले आम्ही पारनेरकर सामाजिक विचारपीठ राज्याला नव्हे तर देशाला दिशा देणारे ठरणार आहे.पारनेरच्या पाणीप्रश्नासाठी जेलभरो आंदोलनाची तयारी ठेवा.मी तुमच्यासोबत सर्वात पुढे असेल,अशी प्रेरक ग्वाही जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिली.

राळेगणसिद्धी परिवार, आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान व पारनेर तालुका पत्रकार संघ यांनी एकत्र येत सुरू केलेल्या आम्ही पारनेरकर सामाजिक विचारपीठच्या माध्यमातून पारनेर तालुक्‍याचा पाणीप्रश्न व स्पर्धा परीक्षा याविषयावर रविवारी राळेगणसिद्धी येथे आयोजित मेळाव्यात श्री.हजारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

मेळाव्याची भूमिका आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब बांडे यांनी मांडली.स्वागत व प्रास्तविक राळेगणसिद्धी परिवाराचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पठारे यांनी केले. यावेळी अण्णा म्हणाले,सामाजिक प्रश्न सुटण्यास विलंब लागत असतोच पण त्यासाठी केलेले प्रयत्न प्रामाणिक असतील तर ते नक्की सुटतात.राजकारण विरहीत मोठे सामाजिक संघटन उभे राहावे.निवडणूक संपली की राजकीय जोडे बाजूला ठेवावे.सरकार आंदोलनाला घाबरत नाही ते पडण्याला घाबरत त्यामुळे सरकार पाडण्याची ताकद निर्माण करा.पारनेर तालुक्‍यातील विविध प्रश्नांचा सर्व्हे करून तो शासनाला सादर करा.शासनदरबारी आपण मिळुन पाठपुरावा करू.

जिल्हा परिषदेचे सदस्य संदेश कार्ले,माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे माजी सदस्य विश्वनाथ कोरडे आझाद ठुबे माजी सभापती राहुल झावरे,गणेश शेळके,सरपंच डॉ.राजेश भनगडे,पत्रकार दादा भालेकर कैलास लोंढे विलास गोसावी,सतीश भालेकर,वसंत थोपटे यांनी पाणीप्रश्नावर भूमिका मांडल्या. स्लाइड शोद्वारे विविध प्रस्तावित व पूर्ण झालेल्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली.

यावेळी दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, बाबासाहेब तरटे, माजी सभापती बाबासाहेब तांबे, राम पठारे, पद्माकर भालेकर, शंकर नगरे, डॉ. वासुदेव साळुंके, शिवाजी व्यवहारे, सुखदेव पवार, सखाराम ठुबे, संयोजन समितीचे डॉ. गणेश पोटे, संतोष सोनावळे, मच्छिंद्र लंके, राजेश भंडारी, दादा पठारे, सनी सोनावळे, लाभेश औटी, गणेश भोसले, सुनील हजारे, गणेश भापकर, शाहीर गायकवाड, विजय डोळ, गौरव भालेकर, दादा चौधरी, शरद पवळे, सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी, पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास आबुज, माजी अध्यक्ष मार्तंड बुचुडे, पत्रकार विनोद गोळे, दत्तात्रय शेरकर, विजय वाघमारे, उदय शेरकर शशिकांत भालेकर, ऍड. गणेश कावरे, कल्याण थोरात, डॉ. संजय बांडे, प्रताप खिलारी, सुरेश निवडुंगे, संदीप कोरडे, संदीप खिलारी, तारकराम झावरे, दादा झावरे, दामू झावरे आदींसह पारनेर व नगर तालुक्‍यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन आम्ही पारनेरकर व आम्ही टाकळीकरचे संस्थापक पत्रकार चॉंद शेख यांनी केले.पारनेर तालुका पत्रकार संघाचे सचिव शरद झावरे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.