वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता त्यांच्या लग्नाला मुहूर्त मिळाला आहे. हे लव्ह बर्डस 24 जानेवारीला लग्न करणार आहेत असे समजते आहे. मात्र अद्याप त्याचे ऑफिशियल कन्फर्मेशन होऊ शकलेले नाही. या वर्षाला सुरुवात होत असतानाच वरुण आणि नताशा यांच्या लग्नाची पुन्हा चर्चा सुरू झाली होती.
या विवाह समारंभासाठी कतरीना कैफ, अनिल कपूर, नीतू सिंह, मनिष मल्होत्रा, मलाएका अरोरा, अर्जुन कपूर, जानवी कपूर, कियारा अडवणी, रिया कपूर, करण जोहर आदी सेलिब्रिटींना निमंत्रण दिले गेले आहे, वरूण धवनने गेल्या वर्षभरापासून या लग्नाचा आग्रह धरला होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला लग्न पुढे ढकलावे लागले होते. आतादेखील हे लग्न अगदी साधेपणाने करायचे ठरवले गेले आहे.
घरातील काही निवडक नातेवाईक आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये फारच थोड्या कलाकारांच्या उपस्थितीत हे लग्न होणार आहे. वरूण आणि नताशा हे बालपणीचे मित्र आहेत. नताशा एक फॅशन डिझायनर असून सेलिब्रिटी फॅशन डिझायनर म्हणून ती काम करते.