2024 च्या लोकसभा निवडणूकीची तयारी सुरू; नड्डा करणार देशव्यापी दौरा

नवी दिल्ली – भाजपच्या संघटनात्मक रचनेची डागडुजी करण्याच्या उद्देशाने भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हे 120 दिवसात संपूर्ण देशभराचा दौरा करणार आहेत. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकांना डोळ्यासमोर ठेवून नड्डा यांनी या देशव्यापी दौऱ्याची आखणी केली आहे.

गेल्या निवडणूकीमध्ये देशातील ज्या भागांमध्ये भाजपची कामगिरी समाधानकारक नव्हती, तेथे नड्डा विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत. भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून नड्डा यांच्या या दौऱ्याला प्रारंभ होणार असून उत्तराखंडमधून ते या दौऱ्याला सुरुवात करतील, असे सिंह यांनी सांगितले.

या दौऱ्याची सुरुवात 5 डिसेंबरपासून होण्याची शक्‍यता आहे. या दौऱ्यात ते सर्व राज्यांना भेट देणार असून बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांशी आभासी माध्यमातून चर्चा करणार आहेत. प्रत्येक राज्यातील जिल्हा अध्यक्ष, वरिष्ठ नेत्यांव्यतिरिक्त भाजपच्या प्रत्येक खासदार आणि आमदाराचीही ते भेट घेणार आहेत.

केंद्र सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीसह कामाच्या विविध बाबींविषयी आणि त्याबद्दल जनजागृती कशी करावी याविषयी भाजपा शासित राज्यांमधील पदाधिकारी नड्डा यांना सादरीकरण देतील. नड्डा यांच्या आगोदर भाजप अध्यक्ष असलेले अमित शहा यांनीही अशाच प्रकारे देशव्यापी दौरा करून भाजपची संघटनात्मक बांधणी घट्ट करण्यावर भर दिला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.