परिणीती चोप्रा करतेय बायॉपिकची तयारी 

बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या जीवनावर आधारित असलेल्या बायॉपिकमध्ये परिणीती झळकणार आहे. या बायॉपिकमध्ये आपली भूमिका सक्षमपणे साकारण्यासाठी ती ट्रेनिंग घेत आहे. परिणीतीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत परिणीती बॅडमिंटनच्या कोर्टवर सराव करताना दिसते. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “पहिले आणि आता!’ सायना नेहवाल हे तुला कसे शक्‍य आहे. तसेच या बायॉपिकची शूटिंग ऑक्‍टोंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहितीही तिने दिली.

दरम्यान, परिणीती अगोदर या बायॉपिकमध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार होती. तसेच श्रद्धाने या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले होते. मात्र, शूटींगच्या तारखा जुळत नसल्याचे कारण देत श्रद्धाने चित्रपटातून काढता पाय घेतला. परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास “भुज: द प्राइड ऑफ इंडिया’, “जबरिया जोड़ी’ आणि हॉलिवुडमधील “द गर्ल ऑन द ट्रेन’च्या हिंदी रीमेकमध्ये ती झळकणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.